कांदा बियाण्याची अंकुरण क्षमता कशी वाढवता येईल?
Farmspot AgroShare
कांदा बियाण्याची उगवण क्षमता वाढवण्यासाठी खालील मुद्द्यांचा विचार करावा.
✅ बियाण्याची निवड
▸ कांदा बियाणे चांगल्या गुणवत्तेचे व वातावरणाशी जुळवून घेता येईल असे निवडावे. जेणेकरून जर बियाणे चांगल्या प्रतीचे असेल तर त्यांची उगवण क्षमता चांगली असते.
✅बीजप्रक्रिया
▸ कांदा बियाण्यास जर योग्य प्रकारे बीजप्रक्रिया केली तर बियाण्याचे जमिनीत असणाऱ्या बुरशींपासून संरक्षण होते व त्यामुळे बियाण्याचे नुकसान होत नाही. त्यामुळे पेरलेले जास्तीत जास्त बियाणे उगवून येते व बियाण्याची उगवण क्षमता वाढते.
✅ पाणी नियोजन
▸ बियाणे पेरणी केल्यानंतर मातीच्या प्रकारानुसार, जलसिंचन प्रकारानुसार व वातावरणानुसार पाणी नियोजन करावे. जर जमिनीमध्ये योग्य प्रकारे ओलावा असेल तर बियाण्याचे अंकुरण त्यात वाढते परंतु जर ओलावा जास्त किंवा कमी असेल तर अंकुरण क्षमता किंवा उगवण क्षमता कमी होते.