आले (अद्रक) लागवडीपूर्वी बीजप्रक्रिया कशी करावी? (संपूर्ण माहिती आणि १० सर्वोत्तम पर्याय)

आले / अद्रक बीज प्रक्रिया संपूर्ण माहिती

आले / अद्रक बीजप्रक्रिया कशासाठी करावी:

  • कंद सुकवल्यानंतर कंदास कोंब व डोळे येतात आणि जेव्हा आपण अशा कंदाची लागवड जमिनीत करतो त्यावेळी जमिनीत असणाऱ्या पिथियम, रायझोक्टोनिया या बुरशीमुळे कंद उगवण्यापूर्वी व कंद उगवणीनंतर कंद कुज होत असते. ती कंदकुज होऊ नये म्हणून आले लागवडीपूर्वी बीजप्रक्रिया करणे गरजेचे आहे.
  • ज्यावेळेस आपण आले / अद्रक कंदाची लागवड जमिनीत करत असतो त्यावेळेस जमिनीत असणाऱ्या किडी (हुमणी, काळे कुरतडणारी अळी) या कंदास किंवा निघणाऱ्या नवीन कोंबास जखमा करतात. व त्या जखमांमधून जमिनीतल्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो व कंद कुज होते. हे कंद कुज होऊ नये म्हणून बीजप्रक्रिया करणे गरजेचे आहे.
  • आले / अद्रक बीजप्रक्रिया केल्यामुळे कंदाची एकसारखी उगवण होते व पांढऱ्या मुळांची चांगली वाढ होते.

बीजप्रक्रियेसाठी कोणती उत्पादने वापरावीत:

आले / अद्रक पिकात बीजप्रक्रियेसाठी १ बुरशीनाशक, १ कीटकनाशक व १ पोषक उत्पादन वापरायचे आहे.

बीजप्रक्रिया उत्पादनांचे विविध पर्याय:

पर्याय १

Syngenta Vibrance Integral 3 ml प्रती लीटर
Syngenta Isabion 2 ml प्रती लीटर
पर्याय २

Syngenta Vibrance premium 3 ml प्रती लीटर
Syngenta crusier 350 FS 1 ml ते 1.5 ml प्रती लीटर
Syngenta Isabion 2 ml प्रती लीटर
पर्याय ३
Syngenta Apron XL 1.25 ml प्रती लीटर
Syngenta Fortenza Duo 1 ml ते 1.25 ml प्रती लीटर
Syngenta Quantis 2 ml प्रती लीटर
पर्याय ४
Bayer Gaucho 1 ते 1.25 ml प्रती लीटर
Bayer evergoal 1 ते 2 ml प्रती लीटर
Bayer Ambition 2 ते 2.5 ml प्रती लीटर
पर्याय ५
UPL Electron -
IPL SG 2 ml प्रती लीटर
पर्याय ६
UPL Provax 2.5 ml प्रती लीटर
Gharada Hamala 1 ते 2 ml प्रती लीटर
Syngenta Quantis 2 ml प्रती लीटर
पर्याय ७
Biostadt ROKO Flo 1.5 ml ते 2 ml प्रती लीटर
Tata koronda 1.5 ml ते 2 ml प्रती लीटर
Biostadt - Biozyme 2 ते 2.5 ml प्रती लीटर
पर्याय ८
Crystal Bavistin 1 ते 2 gram प्रती लीटर
Tata koronda / Gharad Hamal 1 ते 2 ml प्रती लीटर
Crystal Nutrogen 2 ते 3 ml प्रती लीटर
पर्याय ९
Tata master 2 ते 2.5 ग्रॅम प्रती लीटर
Tata koronda 1 ते 2 ml प्रती लीटर
Isabion / Ambition 2 ते 2.5 ml प्रती लीटर
पर्याय १०
Crystal Blue copper 2 gram प्रती लीटर
Gharada Hamala / Tata koronda 1 ते 2 ml प्रती लीटर
Baviskar Germinator 2 ml प्रती लीटर
महत्त्वाची नोंद: वरील ३ बीजप्रक्रिया पर्याय हे Syngenta कंपनीचे आहेत व थोडे महाग असल्यामुळे आर्थिक आहेत, परंतु गेल्या २ वर्षात तुमच्या शेतात जर कोणत्याही पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव झालेла असेल तर तुम्ही या वरीलपैकी एका उत्पादन पर्यायाचा वापर करावा. परंतु जर मर रोगाची लक्षणे या अगोदर कधी दिसली नसतील तर या उत्पादनाचा वापर करावा.

आले बीजप्रक्रिया कशाप्रकारे करावी:

सुकवलेले व मोड आलेले अद्रक बियाणे जाळीमध्ये किंवा कॅरेट मध्ये घ्यावे. पाण्यामध्ये वरीलपैकी कोणताही एक पर्याय निवडून योग्य प्रमाणात मिसळावा. पाण्याच्या द्रावणात कॅरेट किंवा जाळीतील बियाणे ५ मिनिटे संपूर्ण बुडवून ठेवावे व नंतर सावलीमध्ये सुकवून त्याची लागवड करावी.

Back to blog